प्रतिनिधी /सांखळी
संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेल्या श्री लइराई देवीच्या जत्रोत्सवासाठी होंडा सत्तरी येथे सुमारे 250 धोंडांनी श्री लइराई देवीचे व्रत सुरू केले आहे. व्रताच्या ठिकाणी श्री लइराई देवीची प्रqितमा ठेवून पूजन केले जाते. देवीच्या प्रसादाला गावातील ज्ये÷ नागरिक तसेच लहान मुले येतात. दोन वर्षे कोविडमुळे जत्रोत्सवाला जाता आले नाही, मात्र यावषी देवीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेता येईल. तसेच होमकुंडातून प्रवेश करता येणार आहे, असे महादेव गावकर यांनी सांगितले.
सांखळी मतदारसंघात शेकडो धोंड
सांखळी मतदारसंघात शहर तसेच ग्रामीण भागात पाळी, वेळगे, सुर्ल, कुडणे, आमोणा, न्हावेली, हरवळे या गावातील शेकडो धोंडगण देवी लइराईच्या जत्रोत्सवात सहभागी होणार आहेत. सांखळी परिसरातील धोंड तळावर व्हडले जेवण होणार आहे. तर काही ठिकाणी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. यावेळी गावातील लोक सहभागी होतात, भजन, आरती, तीर्थ प्रसाद झाल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन केले जाते.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर धोंडगण होमकुंडातून मार्गक्रमण करतात, असे सुर्ल येथील अनिल पिळगावकर यांनी सांगितले.