पुण्यात कर्तव्यावर असताना हृदयविकाराने निधन
सांगरुळ / प्रतिनिधी
सांगरुळ, (ता. करवीर) गावचे सुपुत्र भारतीय सेनेतील जवान सुभेदार मारुती बळवंत साळुंखे यांचे शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावत असताना पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. भारतीय सेनेमध्ये त्यांनी २९ वर्षे ४ महिने एवढी दीर्घकाळ सेवा केली. मातृभूमीच्या रक्षणासाठी पुणे, चंदिगड,जम्मू काश्मीर, आसाम,राजस्थान, अंबाला याठिकाणी देशाची प्रदीर्घ सेवा केली. देशाची सेवा करत असताना त्यांनी शिपाई पदापासून सुभेदार या वरिष्ठ पदापर्यंत अभूतपूर्व झेप घेतली. सेवानिवृत्त होण्यासाठी त्यांची फक्त आठ महिने बाकी होते.
मारुती साळोखे यांचे पार्थिव दुपारी चार वाजता त्याच्या सांगरुळ या जन्मगावी आणण्यात येणार असून त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी ग्रामस्थांच्यावतीने सुरू आहे. त्यांचे पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण व मुले असा परिवार