सांगली / प्रतिनिधी
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतीदिनी लोकधारा युवा मंचच्यावतीने “दर्पण”कार कै. जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय बक्षी व निवृत्त प्राध्यापक विजय कोगनोळे यांनी प्रतिमपूजन व पुष्पहार अर्पण केला.
यावेळी मंचचे अध्यक्ष गजानन साळुंखे यांनी मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला यावेळी कै.जांभेकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला प्रास्ताविक विजय कडणे यांनी केले आभार प्रशांत साळुंखे यांनी मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे,ज्येष्ठ पत्रकार आप्पा पाटणकर,शाहीर चंद्रकांत गायकवाड,श्रीकांत पोरे,शकील शेख,सुरेश सकटे,अजिंक्य पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते.