प्रतिनिधी / सांगली :
भंडारा येथील घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष एडवोकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची भेट भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला. जगात पाऊल टाकण्याआधी जग सोडण्याची वेळ यांच्यावर आली. ही अत्यंत दुर्देवी घटना होती या संवेदनशील विषयाला वाचा फोडण्यासाठी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम ठरविण्यात आला होता.
आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष एडवोकेट स्वाती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील शासकीय दवाखाने महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्रे, महापालिकेचे प्रसूती दवाखाने आदीं ठिकाणी पदाधिकार्यांनी भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली. आज सांगली सर्वोपचार रुग्णालयाचे डॉक्टर यांची भेट घेऊन सिव्हिल हॉस्पिटल संदर्भात असणारी संपूर्ण माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये फायर सिस्टीम लावणे गरजेचे आहे. याचा प्रस्ताव वर शासनात गेलेला असून तो मंजूर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अद्याप दोन वर्ष तो प्रलंबित आहे. सध्या सेंटर्स ऑक्सीजन सिस्टीमचे काम चालू आहे. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरणे तसेच नर्स भरती करण्यात येणे गरजेचे आहे. अशा अनेक बाबी निदर्शनास आल्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर फक्त आंदोलन न करता संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय दवाखान्यांमध्ये ढिसाळ असलेली यंत्रणा सुखसुविधा आदी बाबत माहिती गोळा करण्याचे काम भाजपा महिला पदाधिकारी करत आहे. त्या अनुषंगाने शनिवारी रुग्णालयातील संपूर्ण माहिती घेऊन संपूर्ण खबरदारी घेण्याबाबत सूचना देखील पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, सविता मदने, अप्सरा वायदंडे, कल्पना कोळेकर, नसीमा शेख, लक्ष्मी सरगर, शोभा बिकड, माधुरी वसगडेकर, शकुंतला काशीद, ज्योती थोरात, अश्विनी बागल आदीसह पदाधिकारी उपस्थित होत्या.