प्रतिनिधी / सांगली
सांगलीतील वसंत दादा पाटील सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटल च्या आवारामध्ये 100 खाटांचे नवीन सुसज्ज रुग्णालय आणि लहान मुलांसाठी स्वतन्त्र 100 खाटांचे हॉस्पिटल उभारण्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकता दर्शविली.
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी याबाबतची मागणी व निवेदन नुकतेच राजेश टोपे यांना सादर केले. त्यावेळी टोपे यांनी हे आश्वासन दिले.
अर्थसंकल्प 2021मध्ये घोषणा केलेल्या व उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिलेल्या सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या सिव्हिल हॉस्पिटल आवरा मध्ये 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय व 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालयास प्रशासकीय मंजुरी मिळावी यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुंबई मंत्रालय येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले. व सद्य स्थितीची माहिती दिली यावेळी त्यांनी तात्काळ प्रशासकीय मंजुरी देतो असे अभिवचन दिले.