प्रतिनिधी / सांगली
भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी शहरातील घेवारे आयकॉन मध्ये प्रात्यक्षिके केली. आग लागल्यास ती तात्काळ आटोक्यात कशी आणावी असे या प्रत्यक्षिकाचे स्वरूप होते. दरम्यान आग लागल्यास नागरिकांनी काय दक्षता घ्यावी याबाबतही उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
याबाबत बोलताना मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे म्हणाले, भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० अर्भकांचा मृत्यु झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशा घटना महापालिका क्षेत्रात घडणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. अनेक आस्थापना, रुग्णालयांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणी आग आटोक्यात आणण्याची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या प्रत्यक्षिकामध्ये अग्निशमन च्या अधिकरी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.