सांगली : प्रतिनिधी
फ्युजन अकॅडमी, नटराज फौंडेशन व जगन्नाथ साळुंखे मित्र परिवार यांच्या वतीने सोमवारी आगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. व्हॅलेन्टाईन डेचं निमित्त साधून रोटी डे साजरा करण्यात आला. या ग्रुपतर्फे शहरातील बेघर, भिकारी, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना भाजी भाकरी व प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाब देऊन हा प्रेम दिन साजरा करण्यात आला.
सांगलीमध्ये अनेक सामाजिक संस्था असून विविध उपक्रम होत असतात. पण फ्युजन अकॅडमी व नटराज फौंडेशनच्या सयुंक्त विद्यमाने प्रतिवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो असतात यानिमित्ताने तरुण तरुणींना या प्रेमदिनी सामाजिक भान सुद्धा जपण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवण्याचे कार्य या ग्रुपच्या वतीने करण्यात येतो. यंदाही सलग नवव्या वर्षी या मित्रपरिवाराच्या वतीने हा दिन साजरा करण्यात आला. सकाळी दहा वाजता गणपती मंदिर येथून प्रत्येकाने घरातून आणलेल्या पोळी भाजी किंवा जेवणाचा डबा शहरातील ठीकठिकाणी असलेल्या अपंग व्यक्तींना देण्यात आला. तसेच प्रेमाचे प्रतीक म्हणून हे गुलाबाचे फुल भेट देण्यात आले. गणपती मंदिर, पटेल चौक, आमराई रोड, कॉलेज कॉर्नर, दुर्गामाता मंदिर, रेल्वे स्टेशन, राम मंदिर आदी भागात हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात नुत्य दिग्दर्शक सुरज वाघमोडे, जगन्नाथ साळुंखे, सचिन ठाणेकर, कुलदीप देवकुळे, गणेश कांबळे, संतोष खाडे, किरण नाईक, कुलभूषण काटे, चेतना खुळ, चार्वी खुळ, स्मित खुळ, वैभव चव्हाण, समीक्षा आपटे, स्वराली आपटे, प्रथमेश सूर्यवंशी, सतेज सांळूखे, आदींची उपस्थिती होती.