मनपाचे युवा नगरसेवक बाधित; जिल्हाधिकारी कार्यालयातही झाला कोरोनाचा शिरकाव
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे 101 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात 83 आणि ग्रामीण भागात 18 रूग्ण वाढले आहेत. तर 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळीची संख्या 107 झाली आहे. यामध्ये 4 जण सांगली शहरातील आहेत. तर एकजण कुपवाड येथील आहे. एकूण रूग्णसंख्या 3 हजार 538 झाली आहे.
सांगली-मिरजेत नवीन 83 रूग्ण वाढले
सांगली शहरात अॅण्टीजेन टेस्टमध्ये 40 नवीन रूग्ण वाढले आहेत. ज्या व्यक्तीचे वय 50 पेक्षा अधिक आहे, त्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत चालले आहेत. यामध्ये ज्या रूग्णांना सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नाहीत, त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. तर ज्यांना लक्षणे दिसून येत आहेत, त्यांना मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. मिरज शहरात अॅण्टीजेन टेस्टमध्ये 23 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर जे रूग्णांच्या संपर्कात आले होते. त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्य़ांना मात्र तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 2 हजार 125 कोरोना रूग्ण झाले आहेत.
ग्रामीण भागात 18 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्र वगळता जत ग्रामीण भागात मंगळवारी मात्र रूग्णसंख्य़ा कमी वाढली आहे. जत तालुक्यात दहा, कवठेमहांकाळ तालुक्यात एक मिरज तालुक्यात एक तासगाव तालुक्यात एक आणि वाळवा तालुक्यात पाच असे एकूण 18 रूग्ण ग्रामीण भागात वाढले आहेत.
उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू
मंगळवारी जिल्हयात कोरोनाचे उपचार सुरू असताना पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जण हे सांगली शहरातील आहेत. तर एकजण हा कुपवाड येथील आहे. कुपवाड येथील 65 वषीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सांगलीवाडी येथील 65 वर्षीय व्यक्ती, विश्रामबाग येथील 80 वर्षीय व्यक्ती, 52 वर्षीय गर्व्हेमेंट कॉलनी येथील व्यक्ती तर खणभाग फौजदार गल्ली येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 107 झाली आहे.
युवा नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित असणार्या ठिकाणी लोकांना मदत करणार्या युवा नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. माजी महापौर हारूणभाई शिकलगार यांच्या अखेरच्या काळात त्यांचा मोठया प्रमाणात संपर्क आल्याने त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यांच्यावर कोल्हापूरातील अॅपल अॅस्टरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 3538
बरे झालेले 1488
उपचारात 1943
मयत 107