सांगली / प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या सांगलीतील संपाला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मंगळवारी पाठिंबा देण्यात आला. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंहामडंळातील संघटन विरहित कर्मचाऱ्यांचा गेले दहा दिवसापासून हक्क अधिकारा साठी निरंतर संप सुरूच आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात त्वरित विलीनिकरण करा, आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे परिवाराला ५० लाख रुपये त्वरित देऊन परिवारातील सदस्याला परिवहन महामंडळात नोकरी, एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे थकित करारासह पुढील करार त्वरित करावेत. असे प्रतिपादन जिल्हा महासचिव उमरफारूक कमरी यांनी केले. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा संघटक संजय कांबळे, सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे, अनिल मोरे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.