प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. सलग दुसऱया दिवशी जिल्हÎात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सर्वाधिक असे 762 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 133 तर मिरज शहरात 65 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 314 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात चार हजार 869 रूग्ण आहेत. खानापूर तालुक्यात 89 रूग्ण वाढले आहेत.
महापालिका क्षेत्रात 198 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या पहिल्यांदा 100 ने वाढत होती आता ती 200 च्या जवळ पोहचली आहे. बुधवारी तर महापालिका क्षेत्रात नवीन 198 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 133 तर मिरज शहरात 65 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 19 हजार 228 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 82 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 564 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात तर तब्बल 564 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात सर्वाधिक असे रूग्ण आढळून आले आहेत.खानापूर तालुक्यात 89 रूग्ण वाढले आहेत. आटपाडी तालुक्यात 60 रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात 26, कवठेमहांकाळ तालुक्यात 41, मिरज तालुक्यात 69 तर शिराळा तालुक्यात 49 रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात 65 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 52 तर पलूस तालुक्यात 31 आणि तासगाव तालुक्यात 82 रूग्ण वाढले आहेत.
दहा जणांचा मृत्यू
जिल्हÎात सलग दुसऱया दिवशी दहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यातील एकाचा तर मिरज तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. वाळवा आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी एक रूग्ण दगावला आहे. तर मिरज शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 872 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हÎाचा मृत्यूदर 3.67 टक्के झाला आहे.
314 कोरोनामुक्त
जिल्हÎात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 314 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हÎात 57 हजार 499 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 50 हजार 758 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 762
उपचारात 4869
बरे झालेले 50758
एकूण 57499
मृत्यू 1872
बुधवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 60
कडेगाव 52
खानापूर 89
पलूस 31
तासगाव 82
जत 26
कवठेमहांकाळ 41
मिरज 69
शिराळा 49
वाळवा 65
सांगली शहर 133
मिरज शहर 65
एकूण 762
लसीकरण
आजचे लसीकरण 18428
आजअखेर लसीकरण 341124