प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाने पाच जणांचा बळी गेला आहे. तर शुक्रवारी नवीन 363 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 34 तर मिरज शहरात 25 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 214 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात तीन हजार 385 रूग्ण आहेत.
मनपाक्षेत्रात 59 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्ण वाढताना दिसून येत आहेत. शुक्रवारी सांगली शहरात 34 तर मिरज शहरात 25 वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 18 हजार 493 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 90 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारात सहा ते सात टक्के रूग्ण आहेत.
ग्रामीणभागात 304 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी ग्रामीण भागात तर 304 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात सर्वाधिक असे 64 रूग्ण आढळून आले आहेत. वाळवा तालुक्यात 54 रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात 36, कवठेमहांकाळ तालुक्यात 18, मिरज तालुक्यात 31 तर शिराळा तालुक्यात 30 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 21 तर खानापूर तालुक्यात 29 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 10 तर तासगाव तालुक्यात 11 रूग्ण वाढले आहेत.
पाच जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सलग चौथ्यादिवशी उपचार सुरू असणाऱया पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील एकाचा तर मिरज ग्रामीण मधील एकाचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्हÎात आजअखेर एक हजार 837 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हÎाचा मृत्यूदर 3.65 टक्के झाला आहे.
214 कोरोनामुक्त
जिल्हÎात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 214 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्हÎात 54 हजार 656 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 49 हजार 434 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 363
उपचारात 3385
बरे झालेले 49434
एकूण 54656
मृत्यू 1837
शुक्रवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 64
कडेगाव 21
खानापूर 29
पलूस 10
तासगाव 11
जत 36
कवठेमहांकाळ 18
मिरज 31
शिराळा 30
वाळवा 54
सांगली शहर 34
मिरज शहर 25
एकूण 363