सांगली/प्रतिनिधी
वृत्तपत्र विक्रेत्यांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन सांगलीत उत्साहात पार पार पडले. 26 व 27 जानेवारी असे दोन दिवस माधवनगर नगर रोडवरील शांतिनिकेतन येथे अधिवेशन पार पडले.
26 जानेवारीला अधिवेशनाच्या निमित्ताने सांगलीतून वृत्तपत्र विक्रेत्यांनी सायकल रॅली काढली. सायंकाळी करमणुकीचे कार्यक्रम तसेच दुपारी केंद्रीय समितीची बैठक सर्वसाधारण सभा, मुक्तचिंतन आधी कार्यक्रम पार पडले. आज, सोमवारी 27 रोजी अधिवेशनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. माजी मंत्री डॉक्टर सुरेश खाडे, आमदार संजय केळकर, आमदार विक्रम सावंत व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर संगीता खोत यांच्यासह वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, संचालक मारुती नवलाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, जिल्हा सरचिटणीस विशाल रासनकर, जिल्हा संघटक सचिन चोपडे, राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, यांच्या सह राज्यभरातून वृत्तपत्र विक्रेते व एजंट पदाधिकारी आदी उपस्थित होते. अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात आले तसेच विविध विषयावर परिसंवाद घेण्यात आले.