प्रतिनिधी / सांगली
सांगली येथील शिवसेना कार्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नगरसेवक सागर घोडके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित जुन्या शिवसैनिकांनी सागर घोडके यांना सांगलीतील प्रलंबित प्रश्नाबद्दल आवाज उठविण्याचे आव्हान केले. यावेळी बोलताना घोडके म्हणाले की शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या माध्यमातून महापालिकेत प्रलंबित प्रश्नाबद्दल आवाज उठविणार असल्याचे सांगितले तसेच डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण याचा विकास करून क्रीडांगण सुसज्ज करणार असल्याचे सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की सांगलीतील जुन्या शिवसैनिक यांचे काम अतिशय उत्तम असून सदरचे शिवसैनिक गोरगरीब जनतेच्या व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमी रस्त्यावर उतरत असतात असे त्यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले. तसेच पुढे शिवसैनिकांनी त्यांना अशा सूचना केल्या की सांगलीत सुसज्ज असे क्रीडांगण असणे गरजेचे आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून केंद्र, राज्य सरकार व महापालिका यांच्याकडे पाठपुरावा करून भविष्यात सुसज्य क्रीडांगण होणे अतिशय गरजेचे आहे.
असे शिवसैनिकांनी यावेळी आपले मत व्यक्त केले तसेच सांगलीत मनोरंजनासाठी प्रलंबित काळी खण विकसित करणे हे खूप गरजेचे असून त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे त्यासाठी आपण महापालिकेला तिन्ही पक्षांच्या माध्यमातून धारेवर धरून काळा प्रलंबित खणीचा प्रश्न सुद्धा मार्गी लावावा व काळी खण विकसित करावी ती खूप वर्षाची जुनी सांगलीकर जनतेची मागणी आहे असे शिवसैनिकांनी यावेळी सूचना केल्या यावेळी रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, अनिल शेटे, जितेंद्र शहा, प्रदीप बर्गे, प्रसाद रिसवडे अक्षय सुतार, सतीश पाटील आदि. मान्यवर उपस्थित होते.