प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरात दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर. शनिवारी जिल्ह्यात एकूण १३ रूग्ण वाढले त्यामध्ये सात रूग्ण सांगली शहरात वाढले आहेत. मिरज, दुधोंडी येथे प्रत्येकी दोन, तर बोरगाव व कानकात्रेवाडी येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. जिल्हय़ात एकूण रूग्णसंख्या ४७२ झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या १९८ आहे.
सांगलीत कोरोनाचा कहर
सांगली शहरात कोरोनाने शनिवारीही कहर केला आहे. सात नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर रोडवरील रामनगर येथील एका प्रसिध्द डॉक्टरांच्या हॉस्पिटलजवळील चौगुले प्लॉटमधील ६३ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. इंदिरानगर जवळील विठ्ठलनगर येथे ३२ वर्षीय महिला, वारणाली गल्ली नंबर तीन येथील एक जण पॉझिटिव्ह आला आहे. तर हनुमाननगर येथील तिघेजण पॉझिटिव्ह आले आहेत. दत्तनगर कर्नाळरोड येथे एकजण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या सातही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे.
मिरज, दुधोंडी येथे प्रत्येकी दोन रूग्ण वाढले
मिरज शहरात ब्राह्मणपुरी येथे ६४ वर्षीय व्यक्ती तसेच इस्त्रायलनगर येथील ६३ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील २४ वर्षीय महिला आणि ४२ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. या चारही रूग्णांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या चौघांच्या संपर्कातील सर्वाना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे ५१ वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे. तर आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथे ४३ वर्षीय व्यक्ती बाधित झाली आहे.
नऊ जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील ६९ वर्षीय व्यक्ती, जत तालुक्यातील बिळूर येथील ७५ वर्षीय व्यक्ती, मिरज तालुक्यातील बुधगाव येथील ७५ वर्षीय व्यक्ती, कानकात्रेवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती, नेलकरंजी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, सांगली-जुना बुधगाव रोडवरील ६५ वर्षीय व्यक्ती सात जणांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर परजिल्हय़ातील दोन रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
परजिल्हय़ातील संख्या जिल्हय़ाच्या रूग्णसंख्येतून वजा
सांगली जिल्हय़ात सध्या कोल्हापूर, सोलापूर आणि सीमाभागातून रूग्ण येत आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. पण या रूग्णांची नोंद मात्र त्या त्या जिल्हय़ात करण्यात येत असल्याने जिल्हय़ाच्या रूग्णसंख्येतून आता या परजिल्हय़ातील रूग्णांची संख्या वजा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हय़ाची रूग्णसंख्या आता ४७२ झाली आहे. असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
जयसिंगपूर येथील व्यक्तीचा मृत्यू
मिरजेत कोरोनाचा उपचार सुरू असताना जयसिंगपूर येथील ७४ वर्षीय व्यक्तींचा शनिवारी मृत्यू झाला आहे. पण, या मृत्यूची नोंद ही कोल्हापूर जिल्हय़ात करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
शहरातील दोन हॉस्पिटल सील
शहरातील शंभरफुटी रोडवरील एक डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. तर सांगली-मिरज रोडवरील जिल्हापरिषदेजवळ एका रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यात आल्याने हे हॉस्पिटलही महापालिकेकडून आता सील करण्यात आले आहे. इतर अनेक डॉक्टरांच्याबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. पण, त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱयांनी सांगितले.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण ४७२
बरे झालेले २६२
उपचारात १९८
मयत १२