प्रतिनिधी / सांगली
सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये हळदीची मोठी आवक सुरू झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये मार्केट यार्ड मध्ये ३० हजार क्विंटल इतकी हळदीची आवक झाल्याचे सांगण्यात आले.
हळदीला भावही चांगला मिळत असल्याने सांगली जिल्ह्यासह आसपासच्या भागातून शेतकरी येथे हळद विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे दिसून येते. सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ असून टिंबर एरियामध्ये हळदीवर प्रक्रिया करणारे अनेक कारखाने आहेत. सांगलीमध्ये प्रक्रिया केलेल्या या हळदीला गुजरातसह अनेक राज्यात मोठी मागणी असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.