आरोपपत्रे दाखल करून आरोपींना तात्काळ अटकेत घ्या
प्रतिनिधी / सांगली
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील अत्याचार झालेल्या पीडित व्यक्तींना आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर सदर प्रकरणांमधील आरोपपत्र तातडीने दाखल करावे व संबंधित प्रकरणातील आरोपी अटकेत नसतील तर तातडीने अटकेत घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक वीरकर, प्रविण टीके, अश्विनी शेंडगे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संभाजी पोवार, जिल्हा सरकारी वकील ॲड. देशमुख, अशासकीय सदस्य सुरेश दुधगावकर, संदेश भंडारे आदि. उपस्थित होते.