नगरसेवकाचे नाव सांगून करीत होता दमदाटी, महापालिकेने दुकान केले सील
प्रतिनिधी / मिरज
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नसलेली दुकानकाळे बंद करण्याचे आवाहन करीत असताना महापालिका अधिकाऱ्यांना नगरसेवकाचे नाव सांगून दमदाटी करणाऱ्या दुकानदारास महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी दणका दिला. दहा हजारांचा दंड करुन दुकानाला सील ठोकले. स्टँड चौकातील गीता इसेन्स असे कारवाई केलेल्या दुकानाचे नाव आहे.
सदर व्यापारी हा केंद्र सरकारची कोरोना विषयक नियमावली आणि प्रभागातील नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख करुन अधिकाऱ्यांशी उद्धटपणे बोलत होता. कायद्याचे ब्रम्हज्ञान शिकवून कारवाईसाठी आलेल्या महापालिका आणि पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना परतावून लावण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी सदर दुकानदाराला चांगलीच अद्दल घडविली. दहा हजारांचा दंड करून दुकानाला सील ठोकले.