आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी पंचायत समितीच्या उपसभापती पदावर तडवळे गावचे सुपुत्र दादासो मरगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर भाजप समर्थकानी जल्लोष केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांनी अनुपस्थित रहात निवडीवर बहिष्कार टाकला.
तहसीलदार सचिन मुळीक,सभापती भूमीका बेरगळ, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,माजी उपसभापती तानाजी यमगर, रुपेश पाटील, पुष्पा सरगर यांच्या उपस्थितीत दादासो मरगळे यांची निवड झाली. मान्यवरांची उपस्थितीत दादासो मरगळे यांनी उपसभापती पदाचा पदभार स्वीकारला.तर नेत्यांच्या एका फोनवर उपसभापती पदाचा राजीनामा देणारे रुपेश पाटील यांचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी कौतुक करत सभागृहात गौरव केला.