प्रतिनिधी / सांगली
आमणापूर येथील आदित्य विष्णू पाटील (वय १४) या नववीत शिकणार्या बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. आदित्यच्या घरापाठीमागे नवनाथ पाटील यांचे शेडचे वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग मिस्त्रीला तहान लागल्याने त्यांना पाणी देण्यासाठी आदीत्य गेला असता पत्र्यातील वीज प्रवाहाशी त्याचा संपर्क आल्याने विजेचा जबर धक्का बसला.
त्याला तात्काळ पलूस येथे उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. मनमिळावू स्वभावाच्या आदित्यच्या जाण्याने आमणापूर परिसरात हळहळ व्यक्त आहे.