प्रतिनिधी/सांगली
महानगरपालिकेच्या सांगलीतील प्रसिध्द आमराई उद्यानाच्या विकासासाठी अनेक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यानुसार आमराई उद्यानात वॉकिंग ट्रॅक, सेल्फी पॉईंट्स, धबधबा, आकर्षक स्ट्रक्चर्स तयार करण्यात येणार आहेत. यासाठी किमान ६० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यानंतर मिरज शहरातील उद्यानाचा विकास व कुपवाड शहरात नवीन उद्यान तयार करणे ही कामेही हाती घेण्यात येणार आहेत. अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.