प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील आरग येथे लक्ष्मीवाडी रोडवर असलेले श्री साई समर्थ सुपर मार्केट हे दुकान फोडून चोरट्यांनी साडेनऊ हजारांची रोकड आणि बँकेचे पासबुक, चेकबुक असा ऐवजी लंपास केला. सुपर मार्केटचा लाकडी दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून ही चोरी केली.
सकाळी चोरी झाल्याचा हा प्रकार उघडकीस आला. याबाबत सुपर मार्केट चालक दत्तात्रय रामचंद्र शिंगाडे (वय 42, रा. लक्ष्मीवाडी रॉड, आरग) यांनी ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.