प्रतिनिधी / मिरज :
मिरज तालुक्यातील आरग येथे समोरुन आलेल्या मोटारसायकलीने जोराची धडक दिल्याने रामचंद्र बाबू पाटील (रा. शिंदेवाडी) हे ठार झाले. याबाबत त्यांचा नातू प्रतिक विठ्ठल पाटील (वय 17, रा. जि.प.मराठी शाळेजवळ, शिंदेवाडी) याने मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, मोटारसायकल चालक राजेंदकुमार कडोले (रा. आरग) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतिक आणि त्याचे आजोबा रामचंद्र हे दोघे (एमएच-10-एएल-9305) या मोटारसायकलीवरुन शिंदेवाडीहून आरग गावाकडे येत होते. ते मारुती मंदिरासमोरील चौकात आले असता, समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या सुझुकी ऍक्सेस मोटारसायकल (एमएच-10-सीएच-2161) ने धडक दिली. या अपघातात रामचंद्र पाटील हे जमीनीवर जोरात आदळले. त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.