१४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिकांचे लोकार्पण, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची विशेष उपस्थिती
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाची दुसरी लाट आता सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल. आज १४ रूग्णवाहिकांचे आरोग्य केंद्रांना लोकार्पण होत असून आणखी नविन १६ रूग्णवाहिका देण्यात येतील, अशी ग्वाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
माधवनगर रोड येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर सभागृहात जिल्हा परिषदेच्यावतीने कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विषयक सरपंच कार्यशाळा व १४ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या १४ रूग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, व जयंत पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका देण्यात आल्या. आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आदी उपस्थित होते.