मिरज-म्हैसाळ रस्त्यावर अपघात, एक जखमी
प्रतिनिधी / मिरज
कर्नाटक एसटी आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दादू चोखा कांबळे (वय 35, रा. म्हैसाळ) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला.
दादू कांबळे हे मोटारसायकल (MH-09-AP-7156) घेऊन मिरज-म्हैसाळ रस्त्यावरून म्हैसाळ गावाकडे जात होते. ते टोलनाक्याजवळ आले असता समोरून येणाऱ्या कर्नाटक एसटी ( KA-42-F1555) ला समोरून धडक बसली. दादू यांचे डोके एसटीच्या हेडलाइट बोनेटला जोरात धडकल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच ठार झाला. या अपघातात त्यांचा मित्रही जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.