भिलवडी / वार्ताहर
दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंराच्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुबंर येथे सायंकाळी ५.३० वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदीर परीसरामध्ये भाविकांची उलोट गर्दी उसळली. आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्री क्षेत्र औदुबंर येथे दाखल झाले होते. ओमियक्रोनच्या पार्श्वभुमीवर लोकांना शासानाने घालून दिेलेल्या नियमांचे पालन करण्यावर प्रशासनाकडुन जोर देण्यात आला. पहाठे ५ वाजल्यापासुन दत्त मंदीरामध्ये गर्दी झाली. दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदीर परीसर फुलांनी बहरून गेला.
मागिल वर्षी कोरोनामुळे श्री दत्त जयंती उत्सव यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अनेक भाविकांना जन्मकाळ सोहळा पाहता आला नव्हता. यंदा मात्र शासनाने कोरोना संबंधीचे सर्व नियमांचे बंधन पालन करून हा उत्सव साजारा केला जात आहे. त्यामुळे सर्व भक्तांना दर्शन जलद होत होते. व्यापारी वर्गात सुध्दा यंदा यात्रा भरल्यामुळे चांगला व्यवसाय केल्याचे समाधान पाहावयास मिळत होते. आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती. भाविकानी दत्त पादुकांचे दर्शन घेतले. रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती. औदुंबर मध्ये येणारे चारीही रस्ते गर्दीनी वाहून गेले होते. औदुबंर फाटा या ठिकाणी व औदुबंरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुबंर मध्ये वाहानांची गर्दी झाली नाही.
पहाठे ५ ते ६. ३० पर्यंत काकड आरती, मंगल आरती दुपारी १२ वा महापुजा, नैवद्य, महाआरती, दुपारी महारतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाचे वतिने महाप्रसादाचे आयोजन केले होते. दत्त जन्माचे किर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदीरामध्ये संपन्न झाले. ५.३० वाजता श्री दत्त जन्मकाळ व आरती , रात्री १० ते १२ या वेळेत महापुजा करण्यात आली.तसेच अभिषेक करण्यात आला. आज दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतिने दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दर्शन सुव्यवस्थीतपणे होत होते.