वार्ताहर / देवराष्टे
कडेगाव तालुक्यात शनिवारी दि.16 जानेवारी रोजी करण्यात येणारे कोरोना विषाणु प्रतिबंधक लसीकरण पुढे ढकलण्यात आले असुन पुढील तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याची माहीती कडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक ए.ए.कालेकर यांनी दिली.
कडेगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात 650 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात येणार होती. यासाठी कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय हे केंद्र निश्चित करण्यात आले होते. परंतु लसीकरणासाठी तालुक्याला आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.