शेतकरी, पादचारी व दुचाकी धारकांच्यात घबराट
प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यातील शिवणी येथील शिवणी टेक ते. वडियेरायबाग या रस्त्यावर साजाई मंदिराजवळ शिवणी गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ९ वाजणाच्या सुमारास या ठिकाणी मध्यम आकाराची मगर आढळून आली. यामुळे शिवणी व परीसरातील नागरीकांच्यात घबराट निर्माण झाली आहे. सर्वसाधारणे आठ ते दहा फुट लांबीची मगर एका मोटारसायकल यांना रस्त्यावर दिसली.वनविभागाने तातडीने हालचाली करून या मगरीस पकडून तिच्या जिल्ह्यातील अधिवासात सोडावी अशी मागणी शिवणी व परीसरातील नागरीकांनी केली आहे. कडेगाव तालुक्यात सध्या वळीवाचा परतीचा पाऊस जोरदारपणे पडत आहे. यामुळे तालुक्यातील येरळा व नांदणी या दोन्ही नदया दुथडी भरून वाहत आहेत. या दोन्ही नदया पुढे कृष्णा नदीस मिळत आहेत अगोदरच जिल्ह्यातील विविध ठिकाणी कृष्णा नदित मगरींचा वावर आहे. यामुळे हि मगर उलटया दिशेने दुष्काळी भागात आली असावी असा काही शेतकरी यांचा अंदाज आहे.
ज्या ठिकाणी हि मगर दिसून आली. त्या ठिकाणच्या पासून साधारण एक हजार ते दिड हजार फुटावर येरळा नदी वाहत आहे.त्या ठिकाणी मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यात टेंभू व ताकारी योजनेचे पाणी येत असते. शिवणी टेकावरुन वडियेरायबाग या गावास जाणारा हा रस्ता आहे. तसेच सध्या टेंभू व ताकारी योजनेच्या सतत असणाऱ्या पाण्यामुळे आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. ऊसास पाणी व शेतात जाण्यासाठी या रस्ता चा मोठा वापर होत असतो. यामुळे रस्त्यावरून जाणारे पादचारी, दुचाकी वाहनधारक व शेतकरी यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.तरी या मगरीला वनविभागाने पकडून तीच्या अधिवासात सोडावे अशी मागणी विविध घटकांची आहे.