कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमध्ये एकाला प्लॉट दाखविण्याचा बहाना करून बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून, शिविगाळ करून मोबाइल व रोख रक्कम मिळून २८ हजाराला लुटल्याचा प्रकार रविवारी उघडकिस आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी एकूण चार संशयिताना गजाआड़ केले. त्यांच्या ताब्यातील स्कार्पिओसह ४ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फिर्यादी योगेश जगन्नाथ वाघमारे (वय २९ रा.मणेराजुरी ता तासगाव) यांना प्लॉट दाखविण्याचा बहाणा करुन गुलमोहर कॉलनी, कुपवाड येथील संगम हॉसिंग सोसायटी येथे स्कार्पिओ गाडीतुन घेवुन जावुन फिर्यादीस बंदुक व कोयताचा धाक दाखवून शिवीगाळ करुन त्यांच्याकडील १५ हजार रुपये किंमतीचे मोबाईल व १३ हजार रुपयेचा रोख रक्कम असे २८ हजार रुपयांचा माल फिर्यादीकडुन जबरदस्तीने चोरी करुन नेला होता.
याबाबत गुन्हा दाखल झाल्याने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने संशयित संजय अजय पाटील (वय २८ रा.कारंजे चौक, मिरज), विनीत विशाल कांबळे (वय १९ रा. कवलापुर) यांना अटक करून कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सपोनि निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजु अन्नछत्रे यांच्या तपास पथकाने त्यांची कसुन चौकशी केली असता याप्रकरणी आणखी दोन नावे निष्पन्न झाली. त्यानुसार चंद्रकांत जगन्नाथ मंडले (वय २९ रा. सावळज), शुभम सुनिल भंडारे (वय २१ रा. कवलापुर) यांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हयात वापरलेली स्कार्पिओ गाडी (एम. एच. ०५ एबी ७८७८) तसेच फिर्यादीचा मोबाईल व इतर साहित्य मिळून ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.