कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील अकूज ड्रीमलँड वसाहतीत बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एक बंद फ्लॅट फोडून तीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
फ्लॅटमालक जोगिंदरपाल बेलिराम भुबंला ( सध्या रा.कुपवाड मूळ गाव पंजाब) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाची कडी काढून अज्ञाताने फ्लॅटमध्ये लाकडी कपाटात ठेवलेली ३ लाख १७ हजार रुपयांची रोखड़ चोरी केली. याप्रकरणी पोलिसांनी चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोगिंदरपाल भुबंला येथील अकूज ड्रीमलँड वसाहतीत राहतात. बुधवारी रात्री अज्ञाताने फ्लॅटच्या दरवाज्याजवळ अडकविलेल्या चावीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. लाकडी कपाटातील रोख रक्कम ३ लाख १७ हजार रुपयांची चोरी केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करीत आहेत.