कुपवाड / प्रतिनिधी
हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरुन वसीम अल्लाबक्ष मुल्ला (३१, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) या रिक्षा चालकास अज्ञात तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे.
कुपवाड एमआयडीसीतील एका कंपनीसमोर हा प्रकार घडला असून याबाबत कुपवाड पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, कुपवाड एमआयडीसीतील ‘मालास’ कंपनीसमोर २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास फ़िर्यादी वसीम मुल्ला हा कामावर जाण्यासाठी थांबला होता. यावेळी अज्ञात तिघेजण वसीम जवळ आले. त्यांनी वसिमला हॉटेलचे बिल का दिले नाहीस ? असे म्हणून लाथाबुकक्यानी बेदम मारहाण व शिवीगाळ करून जखमी केले. याबाबत मुल्ला याने मारहाण करणाऱ्या तिघा अज्ञातांविरोधात फ़िर्याद दिली. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.