प्रतिनिधी / सांगली
केंद्रीय जीएसटी सांगली विभागाच्या सहायक आयुक्त पदी भारतीय महसूल सेवेच्या २०१९ तुकडीचे अधिकारी असलेले राजकुमार के यांची नेमणूक झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळते सहायक आयुक्त किशोर गोहिल यांचे कडून स्वीकारला.
मुळचे तेलंगणा येथील असलेले राजकुमार के यांनी आय आय टी,पवई,मुंबई येथून आपली पदवी प्राप्त केली. तद्नंतर त्यांची २०१९ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवा भरतीद्वारे केंद्रीय अप्रत्यक्ष कर (जीएसटी) व सीमा शुल्क विभागात निवड झाली.सांगली जीएसटी कार्यालयात किशोर गोहिल यांना निरोप तर राजकुमार के. यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त मोहन वाघ, अधीक्षक रवींद्र कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, निवेन तेलंग ,वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यावेळी उपस्थित होते.