प्रतिनिधी / सांगली
सोमवारी जिह्यात एकाच दिवशी विक्रमी 40 रूग्ण वाढले आहेत. तर 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्येने 681 चा आकडा पार केला आहे. उपचार सुरू असणाऱया मिरजेतील दोघांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे जिह्यात कोरोनाने आतापर्यंत 21 बळी गेले आहेत. सध्या उपचारात 321 रूग्ण आहेत.
सांगली-मिरजेत कोरोनाचा कहर सुरूच
सांगली, मिरजेत कोरोनाने कहर करण्यास सुरवात केली आहे. सांगली शहरात दिवसभरात नवीन 12 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये चांदणी चौक येथील चार रूग्ण, कलानगर येथील चार रूग्ण, पार्श्वनाथनगर येथे तीन आणि संजयनगर बेसन मील जवळील एक रूग्ण यांचा समावेश आहे. मिरजेतही दिवसांत नवीन सहा रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये पंढरपूर रोड येथे एक, सैनिक नगर वसाहत येथे एक, पाटील गल्ली येथे एक रूग्ण वाढले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या आता 118 च्यावर गेली आहे. सांगली मिरजेत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दोन्ही शहरात मोठय़ा प्रमाणात रूग्ण वाढत चालले आहेत.
मालगाव, बेळंकी, गुलगुंजनाळ, शिंदेवाडी, कवलापूर येथे रूग्ण वाढले
मिरज तालुक्यातील मालगावमध्ये चार रूग्ण वाढले त्यामध्ये 40,45 आणि 30 वर्षाची महिला पॉझिटिव्ह आली आहे. तर 30 वर्षीय व्यक्तीही बाधित आढळून आला आहे. बेळंकी येथे चार रूग्ण वाढले. त्यामध्ये 34 वर्षीय व्यक्ती, 13 वर्षाची मुलगी आणि 12 वर्षाचे दोन मुले बाधित आढळून आली आहेत. शिंदेवाडी येथील 11 वर्षाची मुलगी आणि 65 वर्षीय व्यक्ती तर कवलापूर येथील 25 वर्षाची महिला आणि 24 वर्षीय युवक बाधित झाला आहे. जत तालुक्यातील गुलगुंजनाळ येथे तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये 66 वर्षीय व्यक्ती, 60 वर्षीय महिला आणि 13 वर्षांचा मुलगा बाधित झाला आहे. या सर्वाच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
शिराळा, चरण, सय्यदवाडी, रांजणी, सराटी, उमदी ,नेलकरंजी येथे रूग्ण वाढले
शिराळा तालुक्यातील शिराळा शहरात 26 वर्षीय व्यक्ती, तालुक्यातील चरण येथील 17 वर्षाचा युवक, सय्यदवाडी येथील 36 वर्षीय महिला बाधित झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील 50 वर्षीय व्यक्ती, सराटी येथील 44 वर्षीय महिला तर जत तालुक्यातील उमदी येथील 10 वर्षाचा मुलगा आणि आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील 53 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आली आहे.
एकाच दिवसांत 21 जण कोरोनामुक्त
जिह्यात सोमवारी 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकाच दिवशी विक्रमी 21 रूग्ण बरे होवून बाहेर पडले आहेत. या रूग्णांना आता होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
मिरजेतील दोघांचा बळी
मिरज शहरातील नदीवेस भागात राहणारी 55 वर्षीय व्यक्ती रविवारी बाधित आढळून आली. पण, ही व्यक्ती बाधित झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. तर मिरज शहरातीलच सैनिक वसाहत येथे राहणारी 55 वर्षीय महिलेवर उपचार सुरू असतानाच तिचा संध्याकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने दोघांचे बळी गेले आहेत. जिल्हय़ात एकूण बळीची संख्या आता 21 झाली आहे.
सलग पाच दिवसांत सात मृत्यू
जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. सलग पाच दिवसांत सातजणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. गुरूवारी आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा, शुक्रवारी पलूस तालुक्यातील नागठाणे येथील 60 वर्षीय व्यक्तीचा, शनिवारी भिकवडी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा, रविवारी मिरजेतील 78 आणि सांगलीतील 80 वर्षीय महिलांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी मिरजेतील 55 वर्षीय व्यक्ती आणि 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील मृत्यूचा दर आता वाढू लागला आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 681
बरे झालेले 339
उपचारात 321
मयत 21