शहरात दोन, जत तालुक्यात एक कोव्हिड सेंटर उभारणार ः जिल्हा नियोजनमधून आत्तापर्यंत कोव्हिड निवारणासाठी 17.30 कोटी खर्च
प्रतिनिधी/सांगली
कोरोनाची तिसरी लाट जिल्हÎात येऊच नये यासाठी यंत्रण सतर्क आणि सुसज्ज करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीमधून आत्तापर्यंत 17.30 कोटी रूपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सांगली शहरात दोन आणि जत तालुक्यात एक अशी तीन सुसज्ज कोव्हिड हॉस्पिटल उभा करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यात पुकारण्यात आलेल्या अनलॉकच्या पार्श्वभूमीवर जिल्हÎातही आता काही प्रमाणात सवलती देण्यात येत आहेत. मात्र कोरोनाचा धोक संपलाच या भ्रमात नागरिकांनीही राहू नये असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयत पालकमंत्री पाटील यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना ना. पाटील यांनी कोरोनाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट केले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्याची तयारी सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात 10 निव्होनेटर व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया राबवावी. या संबंधिची औषधेही उपलब्ध करुन ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी. असे आदेश प्रशासनाला देण्यात आले असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या बैठकीस खा. संजयकाका पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आदीच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा पॉझिटिव्हिटीचा रेट 11 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. हे दिलासादायक चित्र असून हा कोरोना हा रेट आणखी खाली आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल आहे. रूग्णसंख्या आटोक्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यामुळे दिवसाला 53 मेट्रीक टन लागणारा ऑक्सिजन आता 34 मेट्रीक टनापर्यंत खाली आला आहे. सुमारे 1500 रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.
जिह्यात दिलासादायक चित्र असले तरी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. जानेवारीपासून सुमारे 5 लाख 16 चाचण्या झाल्या आहेत. सध्या दिवसाला 7 ते 8 हजार कोरोना चाचण्या होत आहेत. कोरोनाचा कहर काही अंशी कमी आला असला तरी जनतेने सूचनांचे पालन करावे. कोरोनाचा धोका संपला या भ्रमात राहू नये. भौगोलिक दृष्टÎा सर्वात मोठा असणाऱया जत तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी एक कोव्हिड हॉस्पीटल आणि सांगली शहरात महापालिका व सिव्हिल हॉस्पीटल आवारात एक कोव्हिड हॉस्पीटल उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतार्पंत जिल्हा नियोजनमधून 17.30 कोटी खर्च झाले असले तरी अधिक खर्चाची तरतुद करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर सवस्तिर माहिती सांगू असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
व्यापाऱयांच्या मागणीचा सकारात्मक विचार करू
लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात व्यापारी संघटनासह विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली. जिल्हा पातळीवर प्रशासनाच्या अधिकारात त्यांना सवलती देण्यात येतील. परंतु राज्य शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. संघटनांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. कदाचित येत्या गुरूवारपर्यंत जर पॉझीटिव्हिटी रेट कमी आला तर अनलॉक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.