प्रा. शरद पाटील यांची माहिती, प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासकीय यंत्रणा उपाययोजनांमध्ये कुचकामी ठरली असल्याचा आरोप करीत उपचार घेणारे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची आणि निवासाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी आता जनता दलाची स्वतंत्र हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी दिली.
मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधा
शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अनेकवेळा जेवणाची आणि निवासाची सोय नसते. परिणामी त्यांची उपासमार होत असल्याने जनता दलाने 9420047282, 9960560550 आणि 9379727272 या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. मदत लागल्यास गरजूंनी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रा. शरद पाटील यांनी केले आहे.