प्रतिनिधी / विटा
खासदार संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्राचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सांगली जिल्ह्याला जिल्ह्याला 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी खानापूर तालुक्यातील 22 गावातील आरोग्य केंद्रांना तब्बल एक कोटी 41 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती शंकर मोहिते यांनी दिली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2020-21 च्या बृहत आराखड्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामध्ये आरोग्यवर्धिनी केंद्राचे नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सांगली जिल्ह्याला जिल्ह्याला 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यासाठीच्या कामांना नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी खासदार संजय पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला होता, असे शंकर मोहिते यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यातील 22 आरोग्य उपकेंद्रासाठी दुरुस्ती व फर्निचर नूतनीकरणासाठी तब्बल 1 कोटी 41 लाखांचा निधी मिळणार आहे. यामध्ये बलवडी, घोटी बुद्रुक, करंजे, मोही, रेणावी, भिकवडी, हिंगणगादे, लेंगरे, माहुली, नागेवाडी, साळशिंगे, आळसंद, ढवळेश्वर, गार्डी आणि कुर्ली या गावांना प्रत्येकी सहा लाख रुपये, पळशी आणि वासुंबे या गावांना प्रत्येकी सात लाख रुपये तर बलवडी, बामणी, भाळवणी, कार्वे आणि मंगरुळ या गावांना प्रत्येकी ७.७५ लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याचे शंकर मोहिते यांनी सांगितले.