प्रतिनिधी / सांगली
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कोरोना लागण झाली आहे.
खा. पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसत होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी तपासणी करुन घेतली व ती पॉझिटिव्ह आली. आपली तब्येत बरी आहे मी योग्य उपचार व काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना चाचणी करुन घ्यावी. मी लवकरच पुन्हा लोकसेवेत रूजू होत आहे असे मनोगत काकानी सोशलमेडियावर व्यक्त केले आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्री वगळता सर्व विधानसभा सदस्य आणि खासदार यांना कोरोना लागण झाली आहे.