वार्ताहर / वळसंग
जत तालुक्यातील खोजनवाडी येथील सावित्री आप्पासाहेब काराजनगी (वय -19 वर्ष) हिचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता घडली.
अधिक माहिती अशी की सावित्री आप्पासाहेब काराजनगी बी एस सी च्या दुसऱ्या वर्षात आर आर कॉलेज येथे शिक्षण घेत होती. ती आपल्या आई वडिलां समवेत गावापासून दोन किलोमीटरवर खोजनवाडी- बिळूर रस्त्याशेजारी असणाऱ्या शेतातील घरात राहत होती. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजता घरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या शेततळ्यात पाणी आणण्यासाठी गेली असता शेततळ्यात पाय घसरून पडली व तिचा मृत्यू झाला. तशी फिर्याद पोलीस पाटील चिदानंद कलमडी यांनी दिली आहे. याबद्दल अधिक तपास जत पोलीस करीत आहेत.