आयुष सेवाभावी संस्थेचा जिल्ह्यात पहिला उपक्रम
प्रतिनिधी / कुपवाड
ऐनवेळी गल्लीबोळात अथवा अडचणीच्या ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमनच्या गाड्या आग विझविण्याची बोळात पोहचु शकत नाहीत, हीच मोठी समस्या निर्माण होते. याला आयुष सेवाभावी संस्थेने दुचाकी ‘फायर बाईक’च्या नव्या संकल्पनेतून पर्याय शोधला आहे.
यापुढे गल्लीबोळात आग लागल्यास ‘आयुष फायर बाईक’ मदतीला धावणार आहे. आयुष संस्थेने जिल्ह्यात राबविलेला हा पहिला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कुपवाडमध्ये बोलताना काढले. आयुष फायर बाइकचे उद्धघाटन कुपवाड येथे पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्वागत करताना आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी आयुष फायर बाइकविषयी सविस्तर माहीती विशद केली.
कुपवाडच्या आयुष सेवाभावी संस्थेने दुचाकी आयुष फायर बाईक ही नवी संकल्पना अंमलात आणली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात अरुंद रस्त्याच्या ठिकाणी, गुंठेवारी वसाहतीत तसेच गावठाण भागात आगीसारख्या दुर्घटनेत अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन आग विझविण्यासाठी पोहचु शकत नाहीत, अशा ठिकाणच्या आगीच्या दुर्घटनेत जीवितहाणी व वित्तहाणी वाचविण्यासाठी आयुष सेवाभावी संस्थेच्या दुचाकी फायर बाइकच्या माध्यमातून मद्त होणार आहे. या फायर बाइकमुळे आग लागल्यास मोठ्या दुर्घटनेत प्राणहानि व वित्तहानी नक्कीच रोखता येईल, असे मत पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.