प्रतिनिधी / जत
जत तालुक्यातील मुचंडी गटातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्याच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
पक्षात प्रवेश केलेल्यामध्ये भाजपचे नेते मारुती पवार, भाग्यश्री पवार, मारुती ठवरे, सरपंच रखमाबाई कोळेकर, लक्ष्मण ओलेकर, गोकूळा निळे, निलावा चव्हाण, बालिका माळी, मायावती मंडले, युवराज घाटके चेअरमन शिवाजी लोखंडे पांडुरंग सोनूर, आवडाप्पा भोसले, शारदा पाटोळे, आप्पासाहेब माळी, मंगल माळी शंकर सोनुर, मनोहर शिंदे, सागर पवार, शिवाजी कोळेकर, कैलास भोसले, प्रमोद शिंदे ,सोनू शिंदे, येदु जाधव, आनंदा सोनुर, प्रकाश माळी, बाजीराव शिवशरण, अनिल चव्हाण, यल्लाप्पा माने ,दामोदर निकम ,नितीन निकम ,परसू नाईक, राहुल माळी ,गुरुसिद्ध माळी, अशोक माळी, पोपट माळी, प्रकाश चव्हाण, तानाजी कोळेकर, संजय पाटोळे, बाळू सोनुर , नितीन कर्वे, श्रीरंग चंदनशिवे दत्ता चव्हाण, ईश्र्वरा चव्हाण यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षात या सर्वांना चांगली ताकद देऊ, असे आश्वासन आ. विक्रम सावंत यांनी केले.