जत / प्रतिनिधी
जत शहरातील सोलनकर चौकात नाका बंदी दरम्यान चारचाकी वाहनातून बेकायदेशीर विक्रीस घेऊन निघालेला गुटखा व वाहन जत पोलिसांनी जप्त केला असून चार लाख २० हजारांचा गुटखा व चारचाकी वाहन, असा आठ लाख २० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. गुरूवारी दि. १ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी शिवानंद चौगुले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाहन चालक सोहेल राजेसाहेब मंगळवेढे (रा. बिळूर, ता. जत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत शहरातील विजापूर – गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील सोनलकर चौकात जत पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून पोती भरून जात असल्याचे आढळून आले.
दरम्यान, वाहनाची झाडाझडती केली असता त्यामध्ये विविध कंपन्याची गुटख्याची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी बेकायदेशीर सापडलेला चार लाख २० हजारांचा गुटखा व चारचाकी वाहन, असा आठ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यासह चालक सोहेल मंगळवेढे याला अटक करण्यात आली आहे. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश मोहिते करत आहेत.
पहिल्या फेरीतील निकालाने निवडणुकीचा निकाल सहकार पॅनेलच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी मतमोजणीची दुसरी फेरी सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते.