प्रतिनिधी / सांगली
बुधवारपासून घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती.
सांगली शहरात किराणामाल, भाजीपाला, चिकन, मटण, अंडी यासह बेकरी पदार्थ, फळे आदींच्या खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. यामुळे सांगली शहरातील दत्त मारुती रोड, मेन रोड, बालाजी चौक, गणपती पेठ, रिसाला रोड या प्रमुख ठिकाणी सकाळी अकरापर्यंत लोकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. यामुळे शहरातील जवळजवळ सर्व प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारपासून मनपा क्षेत्रांमध्ये जनता कर्फ्यू सुरू होत असून आठवडाभर हे निर्बंध राहणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दिवाळी सारखी गर्दी दिसत होती.