म्हैसाळ / वार्ताहर
जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषद मतदार संघात गरीब व गरजू अपंग निराधार यांना जीवनावश्यक वस्तूंचे चे किट वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्राजक्ता नंदकुमार कोरे व सरपंच सौ रश्मी आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे वाटप अक्षय पात्रा आणि राजाभाऊ कोरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
यावेळी बोलताना सौ प्राजक्ता कोरे म्हणाल्या समाजातील गरीब गरजू लोकांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी तसेच दिव्यांगासाठी अनेक शासकीय योजना असतात त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. याचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जि.प. गटनेते राजाभाऊ कोरे, पंचायत समिती सदस्य बंडू पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, उपसरपंच सौ पद्मश्री महावीर पाटील, मनोज जाधव, पांडुरंग घोरपडे, नंदकुमार कोरे प्रमुख उपस्थित होते.