महापालिका क्षेत्रात 254 रूग्ण वाढले
प्रतिनिधी / सांगली
शुक्रवारी जिल्हय़ात कोरोनाचा कहर झाला आहे. विक्रमी 339 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात 254 तर ग्रामीण भागात 85 रूग्ण वाढले आहेत. एकूण रूग्णसंख्या 2643 वर गेली आहे. तर सहा जणांचा बळी गेला आहे. यामध्ये सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविकेचा समावेश आहे. तर 95 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सांगली-मिरजमध्ये कोरोनाचे एकाच दिवसात विक्रम
सांगली-मिरज महापालिका क्षेत्रात एकाच दिवसांत तब्बल 254 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये कोरोना रूग्णांच्या संपर्कातील जवळच्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले होते. त्या व्यक्तीचे स्वॅब आले आहेत. त्यामध्ये एकूण 204 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तातडीने या सर्व रूग्णांना दवाखान्यात हलविण्यात आले आहे. तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये 43 रूग्ण आढळून आले आहेत. सांगली शहरातील गणेशनगर, खणभागामधील एका गल्लीतच 35 नवे रूग्ण आढळून आले आहेत. वारणाली, विश्रामबाग, स्फूर्ती चौक, मंगलमुर्ती कॉलनी, वानलेसवाडी, राममंदिर, विजयनगर, कोल्हापूर रोड, चांदणी चौक, आमराई रोड, दक्षिण शिवाजी नगर, धामणी रोड सांगलीवाडी, याभागातील रूग्ण आहेत. तर मिरजेतील कमानवेस, बेथेलहेम नगर, मिरज जीएमसी हॉस्टेल, सांगली वेस, मद्रासी कॉलनी येथील रूग्ण आहेत. कुपवाड अहिल्यानगर, यशवंतनगर, अजिंक्यनगर, या भागातील रूग्ण आहेत. सांगली शहरात 164 नवे रूग्ण वाढले आहेत. कुपवाड शहरात नऊ रूग्ण वाढले आणि मिरज शहरात 81 रूग्ण वाढले आहेत.
ग्रामीण भागात 92 रूग्ण वाढले
पलूस तालुक्यात भिलवडी येथे पाच, कुंडल येथे दोन, खंडोबाची वाडी येथे एक ब्रम्हनाळ येथे एक, खटावमध्ये दोन आणि पलूस शहरात सात रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव येथे आठ, कवठेमहांकाळ शहरात सात, मिरज तालुक्यातील नरवाड येथे एक, समडोळी येथे आठ, तुंग आणि कसबे डिग्रज येथे प्रत्येकी एक, आरग येथे दोन, अंकली येथे सहा, माधवनगर, कवलापूर, बुधगाव येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे. आटपाडी शहरात पाच आणि कामत येथे एक वाढला. जत शहरात दोन, लोहगाव येथे तीन, शेगाव येथे दोन, सोन्याळ, उटगी, निगडी येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला. कडेगाव तालुक्यातील आसद येथे एक आणि कडेगाव शहरात एक. असे रूग्ण आढळून आले आहेत. शिराळा तालुक्यात कोकरूड येथे तीन, निगडी येथे एक, शिराळा शहरात एक असे रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात चिखळहोळ, मंगरूळ, आणि विटा शहरात असे प्रत्येकी एक रूग्ण वाढले आहेत. तासगाव येथे एक रूग्ण वाढला. वाळवा तालुक्यात आष्टा आणि मसुचीवाडी येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला आहे.
शहरातील व्यापारी बाधित
शुक्रवारी जे अहवाल आले आहेत. त्यामध्ये सांगली शहरातील एका मोठय़ा व्यापाऱयांचा समावेश आहे. ते आणि त्यांच्या पत्नी पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच मिरजेतील हॉस्टेलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे याठिकाणी असणारी मेडिकलची विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आली आहे.
उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू
कोरोनाने उपचार सुरू असताना सांगली शहरातील 70 वर्षीय माजी नगरसेविकेचा मृत्यू झाला आहे. तासगाव वासुंबे येथील 62 वर्षीय व्यक्ती, मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील 86 वर्षीय वयक्ती, मिरज येथील 70 वर्षीय व्यक्ती , भोसे येथील 75 वर्षीय महिला, पलूस तालुक्यातील खटाव येथील 60 वर्षीय महिला या सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 78 बळी गेले आहेत.
95 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ातील शुक्रवारी उपचार सुरू असणारे तब्बल 95 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 25 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 2643
बरे झालेले 1128
उपचारात 1437
मयत 78