प्रतिनिधी / सांगली
गुरूवारी जिल्हय़ात विक्रमी 241 रूग्ण वाढले आहेत. तर 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या 2307 झाली आहे. महापालिका क्षेत्रात तब्बल 134 रूग्ण वाढले आहेत. तर ग्रामीण भागात 107 रूग्ण वाढले आहेत. जिल्हापरिषदेमध्ये पुन्हा कारोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हापरिषद सदस्य, जिलहापरिषदेतील कार्यकारी अभियंता आणि चार कर्मचारी बाधित झाले आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रात 134 रूग्ण वाढले
सांगली-मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढत चालले आहेत. सलग आठव्या दिवशी महापालिका क्षेत्रात 100 हून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात मोठयाप्रमाणात सुरू असणाऱया रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये 50 वर्षापेक्षा अधिक वयाचे सर्व लोक पॉझिटिव्ह येत चालले आहेत. याशिवाय कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वॅबही मोठय़ाप्रमाणात घेण्यात येत चालले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात रूग्ण वाढत चालले आहेत. 130 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये रूग्णांच्या संपर्कात आलेले 111 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये 16 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील सांगली शहरात 64 रूग्ण वाढले आहेत. तर मिरज शहरात 70 रूग्ण वाढले आहेत. सांगली आणि मिरजेच्या प्रत्येक भागातील हे रूग्ण आहेत. सांगली शहरातील खणभागमधील राहणारी माजी नगरसेविका बाधित आढळून आली आहे. तिचा मुलगा सामाजिक कार्यात सातत्याने असतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात आता आलेल्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तसेच माजी महापौरांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब महापालिकेकडून घेण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात 107 रूग्ण वाढले
कडेगाव तालुक्यातील नर्ली येथे एक, वडगाव येथे दोन, कान्हेरेवाडी येथे एक रूग्ण वाढला. पलूस तालुक्यातील खटाव येथे सहा, सावंतपूर येथे पाच, वसगडे येथे तीन, सुखवाडी येथे तीन, अंकलखोप येथे एक आणि माळवाडी येथे दोन रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यातील सलगरे येथे दोन, गुंडेवाडी येथे एक, कवठेपिरान येथे एक, बेडग येथे पाच, भोसे येथे नऊ, दुधगाव येथे एक, वड्डी येथे एक, अंकली येथे सात, कर्नाळ येथे एक मौजे डिग्रज येथे दोन, आरग येथे तीन, हरीपूर येथे एक असे रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यातील अंकलगी येथे एक, जत शहरात 11, बिळूर येथे दोन, उमराणी येथे एक, पाच्छापूर येथे एक रूग्ण वाढला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे दोन आणि करोली टी येथे एक रूग्ण आढळून आला आहे. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे एक आणि शिराळा शहरात एक रूग्ण वाढला. खानापूर तालुक्यातील विटा शहरात चार रूग्ण वाढले. आटपाडी तालुक्यातील बालेवाडी येथे एक वाढला. तासगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे दहा आणि तासगाव शहरात दोन रूग्ण वाढले आहेत. वाळवा तालुक्यात भडकंबे येथे एक, आष्टा येथे दोन, शिगाव येथे दोन, कोरेगाव येथे एक , ताकारी येथे दोन आणि इस्लामपूर शहरात तीन रूग्ण वाढले आहेत.
जि.प. सदस्य, मिरज पं. स.सदस्य, जि.प.चे कर्मचारी बाधित
गुरूवारी ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामध्ये विद्यमान जिलहापरिषद सदस्य बाधित आढळून आले आहेत. पलूस तालुक्यातील हे सदस्य आहेत. पण त्यांचा जास्त वावर हा सांगली शहरातच असतो. तसेच मिरज पंचायत समितीचे एक सदस्य बाधित आढळून आले आहेत. नेहमी चर्चेत असणारे हे सदस्य बाधित झाले आहेत. तसेच जिल्हा परिषदेतील एक अभियंते व जिल्हा परिषदेचे चार कर्मचारी बाधित झाले आहेत.
चौकट
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
कोरोनाने उपचार सुरू असताना शहरातील खणभागमधील नळभाग येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर मिरज शहरातील कृष्णा घाट येथील 59 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 72 बळी गेले आहेत.
81 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ातील गुरूवारी उपचार सुरू असणारे तब्बल 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 25 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
चौकट
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 2307
बरे झालेले 1033
उपचारात 1202
मयत 72