प्रतिनिधी / सांगली
महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना दि. 15 ते 30 मार्च 2021 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या अर्जदारांना या समितीकडे अर्ज सादर करून सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे व त्रुटी आभावी प्रलंबित आहेत अशा अर्जदारांनी सदर कालावधीत त्रुटी पुर्तता करून विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. त्रुटी पुर्तता न झाल्यास अपुरे पुरावे असलेली प्रकरणे जाती प्रमाणपत्र पडताळणी नियमावली मधील कलम 17(2) व 17 (3) अन्वये निकली काढण्यात येतील याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य संभाजी पोवार यांनी केले आहे.