वार्ताहर / म्हैसाळ
सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार दि २६ रोजी खुली (प्रत्यक्ष) घेणे साठी परवानगी मिळाली असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिसटनसिंगसह सर्वच नियमांचे पालन करीत खुली प्रत्यक्ष सभा घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी दिली.
सदरच्या सभेसाठी सौ कोरे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ व तसेच पालकमंत्री ना जयंतराव पाटील व मा.जिल्हाधिकारीसो यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. शिवाय सदस्यांना येणार्या अडचणीत बाबत चर्चा केली होती याचा मान्यवरांनी विचार करुन शेवटी मा. जिल्हाधिकारीसो यांनी अटी व शर्थीचे अधिन राहून सदरची सभा समक्ष खुली घेणेस परवानगी दिली आहे, असेही कोरे यांनी सांगितले.
यामध्ये सभेस उपस्थित राहणारे सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांचे सुरवातीला च थर्मल स्कॅनिंग करावे,मास्क वापरणे, सभागृह लगतचे प्रवेशद्वार, बैठक कक्ष,भोजनकक्ष, प्रसाधनगृहे, बाथरूम सगळे सॅनिटायझर करावे, सभेचे ठिकाण,माईक व्यवस्था ,ये-जा करणेचे जिन्यावरील मार्गाचे निर्जंतुकीकरण करावे आणि शासन नियमानुसार शारीरिक दृष्ट्या योग्य अंतर राखत सभेचे आयोजन करावे अशा मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा स्पष्ट लेखी सूचना मा. जिल्हाधिकारीसो यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच सभा समक्ष होत असल्याने मोकळे पणाने आपली मते मांडता येणार असल्याने सत्ताधारी व विरोधी गटातील सदस्यांची जय्यत तयारी सुरू झाली होती.शिवाय समाधानाचे वातावरण ही निर्माण झाले आहे