सांगली : प्रतिनिधी
संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ झाला असून यावेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. सांगलीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला.
सकाळीच कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मतदान केंद्राला भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी उमेदवार जयश्री पाटील , पृथ्वीराज पाटील, डॉ. जितेश कदम, शरद लाड, राष्ट्रवादीचे संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. दरम्यान भाजपाच्या वतीने माजी आमदार दिनकर पाटील यांनीही मतदान केंद्राला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्हा बँकेत विकास महाआघाडीचे पॅनल मोठ्या फरकाने विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.