सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले येथे मुंबईहून आलेल्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे याशिवाय सांगली शहरातील रेव्हेन्यू कॉलनी मधील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सांगलीत कोरोना रुग्णांची संख्या 37 वर पोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. हे दोन्ही लोक मुंबईहून सांगलीत बेकायदेशीरपणे आले असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना आरोग्य पथकाने संस्था अलगिकरण केले आहे. त्यांचे स्वब घेण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही ठिकाणी शंभर टक्के लॉकडॉऊन करण्यात येत आहे.