प्रतिनिधी / सांगली
या वर्षीच्या एप्रिल ते जुलै २१ मध्ये जीएसटी संकलनातील मागील एप्रिल ते जुलै २० पेक्षा ३७ % वाढीमुळे जिल्ह्यातील महसुलास दिलासा कायम आहे. अशी माहिती केंद्रिय जीएसटी सांगली कार्यालयाकडून देण्यात आली. डिसेंबर २० पासून सुरु झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जून २१ मध्ये खंडित झाला होता. तो पुन्हा सावरला सांगली जिल्ह्याच्या जुलै २१ च्या जीएसटी संकलनात मध्ये मागील जुलै २० च्या तुलनेने १३ % ने वाढ दिसून येत आहे.
मागील वर्षी एप्रिल ते जुलै २०२० या महिन्यात जीएसटीचे कलेक्शन रु. १९९.७५ कोटी इतके होते. उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलै २१ चा महसूल हा २७४ कोटी इतका झाला. जीएसटी महसुलात सुमारे ७५ कोटीची म्हणजेच ३७ % वाढ झाली आहे.
तर मागील वर्षी जुलै २०२० या महिन्यात जीएसटीचे कलेक्शन . ७२.५० कोटी इतके होते . तर आता जुलै २१ चा महसूल हा रु ८१.८४ कोटी इतका नोंदला गेला. जीएसटी महसुलात सुमारे ९.३४ कोटीची म्हणजेच१३ % वाढ झाली आहे.
मागील वर्षी जुलै २० या कालावधीत हळू हळू अन-लॉक मुळे उद्योग ,व्यवसाय ,सेवा सुरु होत होते .तसेच एप्रिल , मे , जून २० ला कर भरणा करण्यास मुदत वाढ दिली आणि त्यामुळे प्रलंबित कर जुलै २० भरला गेला. मात्र यावर्षी एप्रिल ,मे , जून , जुलै महिन्यात नियमित कर भरणा झाल्याने जुलै महिन्यात महसुलात मागील वर्षी पेक्षा वाढ दिसते आहे.
देशाचा विचार करत असताना जुलै २०२१ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल, रु १,१६,३९३ कोटी आहे . गेल्या वर्षीच्या जुलै महिन्या च्या रु ८७,४२२ कोटी महसुलाच्या तुलनेत ३३ % जादा कर संकलन या महिन्यात झाले. महाराष्ट्राचा विचार करत असताना जुलै २०२१ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल, रु १८,८९९ कोटी आहे . गेल्या वर्षीच्या जुलै महिन्या च्या रु १२,५०८ कोटी महसुलाच्या तुलनेत ५१ % इतके जादा कर संकलन या महिन्यात झाले.