प्रतिनिधी : सांगली
सोमवारी जिल्हय़ात नवीन 683 रूग्ण वाढले आहेत. तर तब्बल 413 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 24 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 23 आणि परजिल्हय़ातील एकाचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 683 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 231 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात सोमवारी नवीन 231 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 188 तर मिरज शहरात 43 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर चौदा हजारापेक्षा अधिक रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या आठ हजार 634 झाली आहे.
ग्रामीण भागात 452 रूग्ण वाढले
ग्रामीण भागातही कोरोनाने गेल्या दहा दिवसापासून हाहाकार सुरूच ठेवला आहे. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. नवीन 452 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 39, जत तालुक्यात 42, कडेगाव तालुक्यात 59 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 37, खानापूर तालुक्यात 30, मिरज तालुक्यात 72 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 18, शिराळा तालुक्यात 23, तासगाव तालुक्यात 65 आणि वाळवा तालुक्यात 67 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 23 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 23 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 29 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालय येथे तर 29 वर्षीय व्यक्तीचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 52 आणि 64 वर्षीय व्यक्ती तर 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. सांगलीवाडी येथील 75 वर्षीय महिलेचा अदिसागर येथे मृत्यु झाला. मिरज शहरात चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये s37 वर्षीय व्यक्तीचा ऍपेक्समध्ये तर 34 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे मृत्यू झाला तर 70 आणि 45 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुपवाड येथील 23 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे तर 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. लोणारवाडी येथील दोघांचा मृत्यू झाला. 65 आणि 70 वर्षीय महिलांचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. चिकुर्डे येथील 70 वर्षीय व्यक्ती, खरसिंग येथील 62 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालय येथे मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 51 वर्षीय व्यक्तीचा एसडीएच हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. ढवळवाडी येथील 58 वर्षीय महिलेचा, वळसंग येथील 60 वर्षीय महिलेचा काप्री येथील 75 वर्षीय महिलेचा आणि कांदे येथील 87 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. कसबे डिग्रज येथील 80 वर्षीय व्यक्तीचा सिव्हील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. इस्लामपूर येथील 65 वर्षीय व्यक्तीचा आधार हॉस्पिटल येथे. मृत्यू झाला. या 23 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 683 झाली आहे.
परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू
परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर येथील 81 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 123 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.
413 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरीसुध्दा कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्याही आता वाढत चालली आहे. सोमवारी 413 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्हय़ातील नऊ हजार 478 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
चौकट
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 17708
बरे झालेले 9478
उपचारात 7547
मयत 683